Uma Mhane Yadyni Maze

Vasant Pawar, G D Madgulkar

मानभंग हाचि झाला मंडपी आहेर
मानभंग हाचि झाला मंडपी आहेर
उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर
उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर

माहेरीच्या सोहळ्यात माहेरीच्या सोहळ्यात
नाहि निमंत्रिले जामात नाहि निमंत्रिले जामात
चहू दिशी चालू होते संपदेचे थेर
उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर

लक्ष्मीचे जमले दास लक्ष्मीचे जमले दास
पुसे कोण वैराग्यास पुसे कोण वैराग्यास
लेक पाठीचीही झाली कोपऱ्यात केर
उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर

आईबाप बंधुबहिणी आईबाप बंधुबहिणी
दरिद्यात नसते कोणी दारिद्यात नसते कोणी
दीन दानतीचे सारे धनाचे कुबेर
उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर

दक्षसुता जळली मेली दक्षसुता जळली मेली
नवे रूप आता ल्याली नवे रूप आता ल्याली
पित्याघरी झाला ऐसा दिव्य पाहुणेर
उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर

परत सासुरऱ्याशी जाता परत सासुरऱ्याशी जाता
तोंड कसे दावू नाथा तोंड कसे दावू नाथा
बोल ईश्वराचे झाले सत्य की अखेर
उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर

प्राणनाथ करिती वास प्राणनाथ करिती वास
स्वर्गतुल्य तो कैलास स्वर्गतुल्य तो कैलास
नाचतात सिद्धी तेथे धरूनिया फेर
उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर

असो स्मशानी की रानी असो स्मशानी की रानी
पतीगृही पत्नी राणी पतीगृही पत्नी राणी
महावस्त्र तेथे होते सतीचे जुनेर
उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर
उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर

Curiosità sulla canzone Uma Mhane Yadyni Maze di सुमन कल्याणपुर

Chi ha composto la canzone “Uma Mhane Yadyni Maze” di di सुमन कल्याणपुर?
La canzone “Uma Mhane Yadyni Maze” di di सुमन कल्याणपुर è stata composta da Vasant Pawar, G D Madgulkar.

Canzoni più popolari di सुमन कल्याणपुर

Altri artisti di Traditional music