Umalali Ek Navi Bhawna
Shantaram Athavale, Jog Prabhakar
उमलली उमलली
उमलली एक नवी भावना
उमलली एक नवी भावना
नसे वेगळी सखे तुझ्याहून माझी संवेदना
उमलली एक नवी भावना
उमलली एक नवी भावना
अघटित गेले अवचित होऊन
विसरुनी गेले मी माझेपण
अघटित गेले अवचित होऊन
विसरुनी गेले मी माझेपण
रेशीमधागे गुंतविणाऱ्या प्रीतिच्या या खुणा
उमलली एक नवी भावना
उमलली एक नवी भावना
वसुंधरेच्या कणाकणांतून
आकाशाच्या अणुरेणूतून
वसुंधरेच्या कणाकणांतून
आकाशाच्या अणुरेणूतून
एक आगळी रसरसलेली प्रकटे नवचेतना
उमलली एक नवी भावना
उमलली एक नवी भावना
हात असावे असेच हाती
हात असावे असेच हाती
अचल ध्रुवापरी अपुली प्रीती
मुक्ती नको मज प्रीतीसाठी जन्म पाहिजे पुन्हा
उमलली एक नवी भावना
उमलली एक नवी भावना
नसे वेगळी सखे तुझ्याहून माझी संवेदना
उमलली एक नवी भावना
उमलली एक नवी भावना