Ya Hridayicha Too Rajeshwar
Shantaram Athavale, Vasant Pawar
लावण्याने लाजून जावे मदनानेही मोहित व्हावे
रूप जयाचे असे मनोहर या हृदयीचा तो राजेश्वर
या हृदयीचा तो राजेश्वर
धर्मासंगे ज्याचे नाते कर्म जयाचे चरण वंदिते
धर्मासंगे ज्याचे नाते कर्म जयाचे चरण वंदिते
त्यात धनंजय जो लोकोत्तर आ आ आ आ
या हृदयीचा तो राजेश्वर या हृदयीचा तो राजेश्वर
कोटि चंद्र जणू नभी झळकती कोटि चंद्र जणू नभी झळकती
अशी जयाची उज्ज्वल प्रीती
कुरवंडावे प्राण जयावर आ आ आ आ
या हृदयीचा तो राजेश्वर या हृदयीचा तो राजेश्वर
धनुष्य ज्याने घेता हाती शत्रु चळचळा रणी कापती
धनुष्य ज्याने घेता हाती शत्रु चळचळा रणी कापती
सदैव विजयी वीर धनुर्धर या हृदयीचा तो राजेश्वर
या हृदयीचा तो राजेश्वर तो राजेश्वर तो राजेश्वर