Te Nayan Bolale Kahi Tari
Dasharath Pujari, Ramesh Anavkar
ते नयन बोलले काहीतरी
ते नयन बोलले काहीतरी
मी खुळी हासले खुळ्यापरी
ते नयन बोलले काहीतरी
निळया नभापरी किंचित निळसर
निळया नभापरी किंचित निळसर
नयन बोलके आणिक सुंदर
बघता बघता मी ही क्षणभर
झाले गं बावरी झाले गं बावरी
मी खुळी हासले खुळ्यापरी
ते नयन बोलले काहीतरी
क्षण माझे मज मलाच न कळे
वसंत नयनी कधी दरवळे
क्षण माझे मज मलाच न कळे
वसंत नयनी कधी दरवळे
तनू कोमल या वेलीवरले
फुल फुले अंतरी
फुल फुले अंतरी
मी खुळी हासले खुळ्यापरी
ते नयन बोलले काहीतरी
मला हवे जे अती मोहक ते
आ आ मला हवे जे अती मोहक ते
कसे अचानक जुळूनी येते
सांगाया मज लाज वाटते
संभ्रमात क्षणभरी संभ्रमात क्षणभरी
मी खुळी हासले खुळ्यापरी
ते नयन बोलले काहीतरी