Panyatali Pari Mee
DASHRATH PUJARI, VASANT NINAVE
पाण्यातली परी मी पाण्यातली परी मी
पाण्यातली परी मी पाण्यातली परी मी
माझ्या मनातला मज लाभेल काय स्वामी
पाण्यातली परी मी पाण्यातली परी मी
घे शोध राजहंसा माझ्या जरा प्रियाचा
तुझियापरी तयाचा तो डौल चालण्याचा
त्याच्यापुढे झुके नभ जाई नमून भूमी
पाण्यातली परी मी पाण्यातली परी मी
त्याचे विशाल डोळे डोळे कमळा तुझ्याप्रमाणे
माझीच दिवस-रात्री ते पाहतात स्वप्ने
तुझियापरी तरंगा मज आवरे न ऊर्मी
पाण्यातली परी मी पाण्यातली परी मी
नगरीस मज प्रियाच्या घेऊन जाइ नौके
मज शैशवातुनी तू दे यौवनात झोके
ये जवळ ये किनाऱ्या होईन तव ऋणी मी
पाण्यातली परी मी पाण्यातली परी मी