Lakhat Labhale

लाखात लाभले भाग्य तुला गं बाई
लाखात लाभले भाग्य तुला गं बाई
विटेवरच्या विठ्ठलाची झालिस रखुमाई
तू गं झालिस रखुमाई

मेघासम जो हसरा श्यामल हसरा श्यामल
चंद्राहुनि तो अधिकही शीतल अधिकही शीतल
नाम जयाचे मुखात येता आ आ
नाम जयाचे मुखात येता
रूप दिसे गं ठायी ठायी
रूप दिसे गं ठायी ठायी
विटेवरच्या विठ्ठलाची झालिस रखुमाई
तू गं झालिस रखुमाई

भक्‍तांचा जो असे आसरा असे आसरा आ आ
भक्‍तांचा जो असे आसरा असे आसरा
या विश्वाचा हरी मोहरा हरी मोहरा
क्षणात इकडे क्षणात तिकडे
क्षणात इकडे क्षणात तिकडे
हाकेला गं धाव घेई
हाकेला गं धाव घेई
विटेवरच्या विठ्ठलाची झालिस रखुमाई
तू गं झालिस रखुमाई
लाखात लाभले भाग्य तुला गं बाई
लाखात लाभले भाग्य तुला गं बाई
विटेवरच्या विठ्ठलाची झालिस रखुमाई
तू गं झालिस रखुमाई
तू गं झालिस रखुमाई

Canzoni più popolari di सुमन कल्याणपुर

Altri artisti di Traditional music