Hi Navhe Chandani
DASHARATH PUJARI, SHANTARAM NANDGAONKAR
ही नव्हे चांदणी ही तर मीरा गाते
ही नव्हे चांदणी ही तर मीरा गाते
हरिरूप गोजिरे पूर्व दिशेला फुलते
ही नव्हे चांदणी ही तर मीरा गाते
गगनात रंगले सूर एकतारीचे
गगनात रंगले सूर एकतारीचे
रंगात जाहले दंग गीत मीरेचे
पक्षीही निघाले
पक्षीही निघाले शब्द वेचण्या त्याचे
हळूहळू नेत्रीचे काजळ रजनी पुसते
ही नव्हे चांदणी
ना भान कशाचे रमली ही भक्तीत
ती गीत गुंफिते भक्तीचे मुक्तीत
तल्लीन शम मग होईल या भावात
भजनात भावना भूपाळीची फुलते
ही नव्हे चांदणी ही तर मीरा गाते
'उजळील कृष्ण हा विश्व आज सोन्याचे
'उजळील कृष्ण हा विश्व आज सोन्याचे
नयनांत साठवुनी घेईल कण तेजाचे
देहात माझिया
देहात माझिया रूप विश्वदीपाचे'
ही भावनाच हृदयात तियेच्या वसते
ही नव्हे चांदणी ही तर मीरा गाते