Ek Tari Sur Jane
Dasharath Pujari, Yashod Kumar Galvankar
कृष्ण गाथा एक गाणे
जाणते ही वैखरी
एकतारी सूर जाणी श्री हरी जय श्री हरी
एकतारी सूर जाणी श्री हरी जय श्री हरी
तू सखा तू पाठिराखा तूच माझा ईश्वर
राहिलासी व्यापुनिया तूच माझे अंतर
आळवीते नाम ज्याला
अमृताची माधुरी
एकतारी सूर जाणी श्री हरी जय श्री हरी
पाहते मी सर्व ते ते कृष्ण रूपी भासते
आणि स्वप्नीं माधवाच्या संगडी मी नाचते
ध्यानरंगी रंगताना
ऐकते मी बासरी
एकतारी सूर जाणी श्री हरी जय श्री हरी
तारिलेसी तू कन्हैया
तारिलेसी तू कन्हैया
दीनवाणे बापुडे
हीन मीरा त्याहूनीही
भाव भोळेभाबडे
दे सहारा दे निवारा
या भवाच्या संगरी
एकतारी सूर जाणी श्री हरी जय श्री हरी