Deepaka Mandile Tula
Kamalakar Bhagwat, B B Borkar
दीपका मांडिले तुला सोनियाचे ताट
जडविला घडविला चंदनाचा पाट
घरदार प्रकाशाने भरीं कांठोकांठ
दारीं आलेल्याची करूं सोपी पायवाट
घातली ताईने तुला रंगांची रांगोळी
पित्याने रेखिल्या गोड भविष्याच्या ओळी
घाशिली समई मी ही केली तेलवात
दह्यात हा कालविला जिरेसाळ भात
दीपका मांडिले तुला सोनियाचे ताट
जडविला घडविला चंदनाचा पाट
गा रे राघू गा ग मैने बाळाच्या या ओळी
गा रे राघू गा ग मैने बाळाच्या या ओळी
मुखी तुमच्याही घालू दुधातली पोळी
कुतू काऊ चिऊ माऊ या रे सारे या रे
सांडलेली शिते गोड उचलुनी घ्या रे
सांडलेली शिते गोड उचलुनी घ्या रे
गुणी माझा बाळ कसा मटामटा जेवी
गुणी माझा बाळ कसा मटामटा जेवी
आयुष्याने थोर करी माये कुलदेवी
दीपका मांडिले तुला सोनियाचे ताट
जडविला घडविला चंदनाचा पाट
जडविला घडविला चंदनाचा पाट