ती गेली तेव्हा रिमझिम

Hridaynath Mangeshkar

आ आ ती गेली ती गेली तेव्हा रिमझिम
ती गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता
ती गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता
मेघात आडकली किरणे
हा सूर्य सोडवित होता
ती गेली ती गेली
ती गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता

ती आई होती म्हणूनी
ती आई होती म्हणूनी
घनव्याकुळ मीही रडलो
घनव्याकुळ घनव्याकुळ मीही रडलो
ती आई होती म्हणूनी ती आई
ती आई होती म्हणूनी
घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध
त्यावेळी वारा सावध
पाचोळा उडवित होता
ती गेली ती गेली ती गेली
ती गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता ती गेली

अंगणात गमले मजला
अंगणात गमले मजला
संपले बालपण माझे
अंगणात गमले मजला
संपले बालपण माझे
खिडकीवर धूरकट तेव्हा
खिडकीवर धूरकट तेव्हा
कंदील एकटा होता
ती गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता
पाऊस निनादत होता
पाऊस निनादत होता
पाऊस निनादत होता

Canzoni più popolari di पं. हृदयनाथ मंगेशकर

Altri artisti di