Manasicha Chitrakar To

P. SAVALARAM, VASANT PRABHU

मानसीचा चित्रकार तो
तुझे निरंतर चित्र काढतो
चित्र काढतो
मानसीचा चित्रकार तो
तुझे निरंतर चित्र काढतो
चित्र काढतो

भेट पहिली अपुली घडता
निळी मोहीनी नयनी हसता
उडे पापणी किंचित ढळता
उडे पापणी किंचित ढळता
गोड कपोली रंग उषेचे रंग उषेचे भरतो
चित्र काढतो

ममस्पर्शाने तुझी मुग्धता
होत बोलकी तुला न कळता
माझ्याविण ही तुझी चारुता
माझ्याविण ही तुझी चारुता
मावळतीचे सूर्यफूल ते सूर्यफूल ते करतो
चित्र काढतो

तुझ्या परी तव प्रीती सरिता
संगम देखून मागे फिरता
तुझ्या परी तव प्रीती सरिता
संगम देखून मागे फिरता
हसरी संध्या रजनी होतान
हसरी संध्या रजनी होतान
नक्षत्रांचा निळा चांदवा
निळा चांदवा झरतो
चित्रकार तो
मानसीचा चित्रकार तो
तुझे निरंतर चित्र काढतो
चित्र काढतो

Canzoni più popolari di पं. हृदयनाथ मंगेशकर

Altri artisti di