Varyane Halte Raan

Gres

वाऱ्याने हलते रान तुझे सुनसान हृदय गहिवरले

गाईचे डोळे करूण उभे की सांज निळाईतले

डोळ्यात शीण हातात वीण
डोळ्यात शीण हातात वीण देहात फुलांच्या वेगी

अंधार चुकावा म्हणून अंधार चुकावा
म्हणून निघे बैरागी निघे बैरागी
वाऱ्याने हलते रान तुझे सुनसान हृदय गहिवरले
वाळूत पाय सजतेस काय
वाळूत पाय सजतेस काय लाटांध समुद्राकाठी
वाळूत पाय सजतेस काय लाटांध समुद्राकाठी
चरणात हरवला गंध
चरणात हरवला गंध तुझ्या की ओठी तुझ्या की ओठी
वाऱ्याने हलते रान तुझे सुनसान हृदय गहिवरले
शून्यात गरगरे झाड तशी ओढाळ
शून्यात गरगरे झाड तशी ओढाळ दिव्यांची नगरी

वक्षात तिथीचा चांद वक्षात तिथीचा
चांद तुझा की वैरी तुझा की वैरी
वाऱ्याने हलते रान तुझे सुनसान हृदय गहिवरले
गाईचे डोळे करूण उभे की सांज निळाईतले
वाऱ्याने हलते रान तुझे सुनसान हृदय गहिवरले
हृदय गहिवरले हृदय गहिवरले

Canzoni più popolari di पं. हृदयनाथ मंगेशकर

Altri artisti di