Lajun Hasane

MANGESH PADGAOKAR, SHRINIVAS KHALE

लाजून हासणे अन्‌ हासून हे पहाणे
लाजून हासणे अन्‌ हासून हे पहाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

डोळ्यांस पापण्यांचा का सांग भार व्हावा
डोळ्यांस पापण्यांचा का सांग भार व्हावा
मिटताच पापण्या अन्‌ का चंद्रही दिसावा
मिटताच पापण्या अन्‌ का चंद्रही दिसावा
हे प्रश्न जीवघेणे
हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे
हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे
हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे
तिरपा कटाक्ष भोळा
तिरपा कटाक्ष भोळा आम्ही इथे दिवाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

जाता समोरुनी तू उगवे टपोर तारा
जाता समोरुनी तू उगवे टपोर तारा
देशातुनी फुलांच्या आणी सुगंध वारा
देशातुनी फुलांच्या आणी सुगंध वारा
रात्रीस चांदण्याचे
रात्रीस चांदण्याचे सुचते सुरेल गाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे
लाजून हासणे अन्‌ हासून हे पहाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

Canzoni più popolari di पं. हृदयनाथ मंगेशकर

Altri artisti di