Mi Bavari Bavari
Sanjay Navgire
पाऊलवाटा रुणझुण वारा
किलबिल पाखरांची
खळखळ पाणी सळसळ पाणी
छम छम छम पैंजणाची
सूर्य डोंगराशी जाता
होई कालव उरात
सारी आगळी अनोखी
आज जरा बिन चित्त
मन अल्लड उनाड
खुळ्या पाखरांच्या परी
मी बावरी बावरी
ल ल ला ल ला बावरी मी बावरी बावरी
ल ल ला ल ला बावरी
ला ला ला ला ला ला ला ला
हि संध्या अशी हि दुनिया
हि किमया कधी का नव्हती
क्षितीजाच्या त्या मावळतीचा
रंग कोवळा गाली
मी फुलराणी फिरता भुंग
मी फुलराणी फिरता भुंग
भिरभिर भवताली
गुणगुण गाणे तरळत जाने
या छंदाची आज का ओढ मला
नभी सुखावली जाई
झोका पारंबीचा जिवा
थेंब झरता नभाचा
ओठी झेलून धरावा
स्वैर्य काही मुक वेडे
त्यास आगळी खुमारी
मी बावरी बावरी
ल ल ला ल ला बावरी मी बावरी बावरी
ल ल ला ल ला बावरी