Reshami Bandhane

Ajay Naik

कधी कुठे कशी निनावी
अनोळखी मने जुळावी
युगायुगांची ही बंधने
नवे नवे अधीर नाते
हवेहवेसे होत जाते
फुलांपरी हळवे कोवळे
मन असे गुंतता बहरली स्पंदने
बरसल्या अक्षता बांधली कंकणे
जोडली रेशमी बंधने
जोडली रेशमी बंधने

भावनांचे गोड नाते
स्वप्नांतले झाले खरे
हो, सप्तकाची पाऊले मनी
उमटली जणू जन्मातरी
सूर नवे छेडता विरली ही अंतरे
जोडली रेशमी बंधने
जोडली रेशमी बंधने

मोहणारे सात फेरे
स्वप्ने नवी सामावली
अमृताचे स्पर्श कोवळे
वेडी ओढ ही श्वासातली
क्षण असे वेचता प्रीत ही रंगली
जोडली रेशमी बंधने
जोडली रेशमी बंधने
जोडली रेशमी बंधने

Canzoni più popolari di बेला शेंडे

Altri artisti di Film score