घुंगराच्या तालावर

घुंगराच्या तालामंदी पैंजण किनकीन वाजल
भेगाळल्या भुईनं या हिरव संपानंच दावल
हे माळरानी ती यकली बांधावर बाभळ
नभाळ्याला ठाव पुसते पावसाचा येरंवळ
सये पानोपानी येता मन वढाया भिजलं
घुंगराच्या तालामंदी पैंजण किनकीन वाजलं
भेगाळल्या भुईनं या हिरव संपानंच दावलं

फेर धरता अभरनाची रंग भिंगरी पाखर
नभाय टाळून फिरती रंगला हा जीव र
पाखरू उडू दे आभाळ भरू दे
घेऊ दे गिरकी भरदार
पाखरू उडू दे आभाळ भरू दे
घेऊ दे गिरकी भरदार
बाभळीच्या कोट्यामंदी उतरू दे अल्वर
बाभळीच्या कोट्यामंदी उतरू दे अल्वर
माळरानी ती यकली बांधावर बाभळ
नभाळ्याला ठाव पुसते पावसाचा येरंवळ
सये पानोपानी येता मन वढाया भिजलं
घुंगराच्या तालामंदी पैंजण किनकीन वाजलं
भेगाळल्या भुईनं या हिरव संपानंच दावलं

Canzoni più popolari di बेला शेंडे

Altri artisti di Film score