Yeshil Tu
मला माहीत आहे की
असे होणार आता
फुलांनी नाव लिहिण्याचा
ऋतू येणार आता
तुला मी पाहते म्हणुनी
खरी सजशील तू जेव्हा
मनाच्या आत डोकावून
मला बगशील तू तेव्हा
नकळता लाजुनी
होकार देशील तू
येशील तू येशील ना
येशील तू येशील ना
मला वाटते ते
तुला वाटते होयना
इथे बहर येता
तिथे उमलते होयना
जरी आहे जरा अंतर
अवस्था वेगळी नाही
जराही भान लोकांचे
तुला नाही मला नाही
नजर भिडता क्षण
अलवार होशील तू
येशील तू येशील ना
येशील तू येशील ना
जशी हवा तास मी
तुझ्या भोवती
उन्हाला जशी सावली
मी तसा सोबती
कुणाला भेटणे नाही
कुणाशी बोलणे नाही
तुझा होकार येतो
जिवाचे पारणे नाही
मला माझे जिणे आणून देशील तू
येशील तू येशील ना
येशील तू येशील तू