Zadavarti Ghade Latakle
ओळखणार ना बरोबर हो हो ओळखा ह
झाडावरती घडे लटकले
झाडावरती घडे लटकले घड्यात होते पाणी
त्या पाण्याच्या वड्या कापूनी कुरुकुरु खातो कोणी
आता सांगा खिरापत माझी सांगा खिरापत (खोबरं)
बरबर
अफगाणातील इजार भारी त्याच्या हाती मोती मोती त्याच्या हाती मोती
त्या मोत्यांना उन्हात सुकवून पोरेबाळे खाती
आता सांगा खिरापत माझी सांगा खिरापत (सांगूका - मनुका)
खर का हो
कोकणातला पिवळा बाळू फार लागला माजू बाळू फार लागला माजू
पकडून आणा भट्टीवरती काळीज त्याचे भाजू ( काजू)
तालमीतला पोर मारतो तिठ्यावरती थापा मारतो तिठ्यावरती थापा
सुरकुतलेली बोटे त्यांचा गोड लागतो पापा
आता सांगा खिरापत माझी सांगा खिरापत - खारका
खर का हो
आता मात्र अगदी बरोबर ओळखल पाहिजे बर का हा
आधी होतीस काळीपिवळी नंतर झालीस गोरी ग नंतर झालीस गोरी
देवळातुनी का ग फिरती वेणूगावच्या पोरी
देवळातुनी का ग फिरती वेणूगावच्या पोरी
फिरती वेणूगावच्या पोरी फिरती वेणूगावच्या पोरी
आता सांगा खिरापत हरला हरलात अरे खडीसाखर
चट्टामट्टा बाळभट्टा आता मागील त्याला रट्टा
पंजा चाटीत निजेल गुपचूप तो वाघाचा पठ्ठा
पंजा चाटीत निजेल गुपचूप तो वाघाचा पठ्ठा
आता झाली खिरापत आता झाली खिरापत
आता झाली खिरापत