Aakashi Zep Ghere Pakhara
आकाशी झेप घे रे पाखरा आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा
तुजभवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया
तुजभवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया हा कुठवर वेड्या घेसी आसरा
सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा
घर कसले ही तर कारा विषसमान मोती चारा
घर कसले ही तर कारा विषसमान मोती चारा
मोहाचे बंधन द्वारा तुज आडवितो हा कैसा उंबरा
सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा
तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थाने
तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थाने
दरी डोंगर हिरवी राने
दरी डोंगर हिरवी राने जा ओलांडुनिया सरिता सागरा
सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा
कष्टाविण फळ ना मिळते तुज कळते परि ना वळते

हृदयात व्यथा ही जळते का जीव बिचारा होई बावरा
सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा
घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले
घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
घर प्रसन्नतेने नटले हा योग जीवनी आला साजिरा