Yashwant Ho Jaywant Ho
मुकेपणाने करिसी सेवा तूच एकला मला विसावा
दुवा काय मी तुजला द्यावा यशवंत हो जयवंत हो
यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो
यशवंत हो जयवंत हो
दुबळ्यापोटी जन्मलास तू नकोस दुबळा ठरू परंतु
दुबळ्यापोटी जन्मलास तू नकोस दुबळा ठरू परंतु
पुरेच कर तू माझे हेतू यशवंत हो जयवंत हो
यशवंत हो जयवंत हो
बालपणी तुज छळिते विपदा थोरपणी तू मिळव संपदा
बालपणी तुज छळिते विपदा थोरपणी तू मिळव संपदा
धनवंताना जिंक दहादा यशवंत हो जयवंत हो
यशवंत हो जयवंत हो
व्यर्थ जन्म रे विद्येवाचुन ज्ञान जगातील घेई वेचून
व्यर्थ जन्म रे विद्येवाचुन ज्ञान जगातील घेई वेचून
कीर्ती आण तू पायी खेचून यशवंत हो जयवंत हो
यशवंत हो जयवंत हो
तू अंधाच्या हाती काठी तू कुलदीपक आईपोटी
तू अंधाच्या हाती काठी तू कुलदीपक आईपोटी
तूच एक मज पुढती-पाठी यशवंत हो जयवंत हो
यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो
यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो