Uth Uth Pandharinatha
ऊठ ऊठ पंढरीनाथा ऊठ बा मुकुंदा
ऊठ ऊठ पंढरीनाथा ऊठ बा मुकुंदा
उठ पांडुरंगा देवा
पुंडलिक वरदा देवा पुंडलिक वरदा
अस्त पातलासे चंद्रा तारका विझाल्या
फुलत फुलत वेलीवरच्या कळ्या फुले झाल्या
जाग पाखरांना आली जाग ये सुगंधा
पुंडलिक वरदा देवा पुंडलिक वरदा
पुंडलिक वरदा देवा पुंडलिक वरदा (पुंडलिक वरदा देवा पुंडलिक वरदा)
पात्र पाणियाचे हाती उभी असे भीमा
दर्शनास आले तुझिया ज्ञानदेव नामा
भक्तराज चोखामेळा दुरून देई सादा
पुंडलिक वरदा देवा पुंडलिक वरदा
पुंडलिक वरदा देवा पुंडलिक वरदा (पुंडलिक वरदा देवा पुंडलिक वरदा)
देह भाव मिळुनी केला काकडा मनाचा
निघून धूर गेला अवघ्या आस वासनांचा
ज्ञानज्योत चेतविली ही उजळण्या अवेदा
पुंडलिक वरदा देवा पुंडलिक वरदा
पुंडलिक वरदा देवा पुंडलिक वरदा(पुंडलिक वरदा देवा पुंडलिक वरदा)