Urali Ekaki Pakshini
उरली एकाकी पक्षिणी
उरली एकाकी पक्षिणी
पंख पसरूनी पिले उडाली
पंख पसरूनी पिले उडाली
अनंत वाटांनी
उरली एकाकी पक्षिणी
उरली एकाकी पक्षिणी
तिने तयावर जीव लावला
घास मुखीचा मुखी घातला
तिने तयावर जीव लावला
घास मुखीचा मुखी घातला
बघता बघता तिलाच सारे
बघता बघता तिलाच सारे
गेले विसरोनी
उरली एकाकी पक्षिणी
उरली एकाकी पक्षिणी
क्षण सौख्याचे चार लाभले
क्षणिक भास ते क्षणात सरले
क्षण सौख्याचे चार लाभले
क्षणिक भास ते क्षणात सरले
क्षणात एका तिला टाकले
क्षणात एका तिला टाकले
वणव्याने गिळूनी
उरली एकाकी पक्षिणी
उरली एकाकी पक्षिणी
हाच जगाचा न्याय असे का
हाच जगाचा न्याय असे का
जीवन म्हणजे घोर सजा का
हाच जगाचा न्याय असे का
हाच जगाचा न्याय असे का
जीवन म्हणजे घोर सजा का
अधांतरी संसार चालला
अधांतरी संसार चालला
अधांतरी सुकुनी
उरली एकाकी पक्षिणी
उरली एकाकी पक्षिणी