Tu Nastis Tar
तू नसतिस तर
तू नसतिस तर
तू नसतिस तर गेले असते
रोप चिमुकले सुकूनवाकुन
तू नसतिस तर केले असते
कुणी तयावर अमृतसिंचन
तू नसतिस तर
तू नसतिस तर
तू नसतिस तर
तू नसतिस तर मिळता कोठुन
घरट्याचा हा रम्य निवारा
तू नसतिस तर मिळता कोठुन
पंखाखाली गोड उबारा
तू नसतिस तर
तू नसतिस तर
तू नसतिस तर
तू नसतिस तर कळली नसती
कळ्याफुलांची कोमल बोली
तू नसतिस तर मिळली नसती
मृदु शीतलता चांदण्यातील
तू नसतिस तर
तू नसतिस तर
तू नसतिस तर
तू नसतिस तर कळले नसते
जीवन म्हणजे अथांग प्रीती
तू नसतिस तर जुळल्या नसत्या
गीताच्या या मंजुळ पंक्ती
तू नसतिस तर
तू नसतिस तर
तू नसतिस तर