Tochi Khara Sadhu
रंजल्या जिवाची गांजल्या जिवाची
रंजल्या जिवाची मनी धरी खंत
तोचि खरा साधू तोचि खरा संत
तोचि खरा साधू तोचि खरा संत
गोरगरिबांना धरूनिया पोटी
पुसुनिया आसू घास देई ओठी
गोरगरिबांना धरूनिया पोटी
पुसुनिया आसू घास देई ओठी
पुण्यवान ऐसा
पुण्यवान ऐसा धरी मोक्षपंथ
तोचि खरा साधू तोचि खरा संत
तोचि खरा साधू तोचि खरा संत
जगाचे कल्याण हीच खरी भक्ती
उपकार सेवा हीच खरी मुक्ती
जगाचे कल्याण हीच खरी भक्ती
उपकार सेवा हीच खरी मुक्ती
ठायि ठायि त्याची
ठायि ठायि त्याची रूपे ही अनंत
तोचि खरा साधू तोचि खरा संत
तोचि खरा साधू तोचि खरा संत
अंधारात होई आंधळ्याची काठी
पांगळ्याला घेई आपुलिया पाठी
अंधारात होई आंधळ्याची काठी
पांगळ्याला घेई आपुलिया पाठी
जनी जनार्दनी
जनी जनार्दनी पाहे भगवंत
तोचि खरा साधू तोचि खरा संत
तोचि खरा साधू तोचि खरा संत
तोचि खरा साधू तोचि खरा संत
तोचि खरा साधू तोचि खरा संत
तोचि खरा साधू तोचि खरा संत