Taat Gele Maye Geli

G. D. Madgulkar

श्रीरामाने कितीही वेळा पटवून सांगितलं तरी
भरताचे डोळे काही कोरडे होई नातं
तो पुन्हा पुन्हा त्यांना म्हणतोय रामा आपण परत चला
राज्याभिषेक करवून घ्या
भरताप्रमाणेच भरता बरोबर आलेल्या
ऋषी जणांनी हि त्यांना पुष्कळ आग्रह केला
परंतु श्री रामाने नम्र पणे त्यांना हि नकारच दिला
ते म्हणाले कि भरता पितृआज्ञेनं मला वनवास
आणि तुला सिंहासन मिळालंय
तू अयोध्येला परत जा अयोध्येचं राज्य कर
हेच धर्मी आणि उचित आहे
पितृ आज्ञे प्रमाणे चौदा वर्षांचा वनवास संपल्या नंतरच
मी सीता आणि लक्षुमणासोबत अयोध्येला परत येईन
श्री रामाच्या या उत्तराने निराश झालेला भरत गहिवरला
आणि रामाच्या पादुकांना स्पर्श करून करुण स्वराने म्हणाला
तात गेले माय गेली भरत आतां पोरका
तात गेले माय गेली भरत आतां पोरका
मागणें हें एक रामा आपुल्या द्या पादुका
मागणें हें एक रामा आपुल्या द्या पादुका

वैनतेयाची भरारी काय मशकां साधते
कां गजाचा भार कोणी अश्वपृष्ठीं लादतें
राज्य करणें राघवांचे अज्ञ भरता शक्य का
मागणें हें एक रामा आपुल्या द्या पादुका

वंशरीतीं हेंच सांगे थोर तो सिंहासनीं
सान तो सिंहासनीं कां ज्येष्ठ ऐसा काननीं
दान देतां राज्य कैसे या पदांच्या सेवका
मागणें हें एक रामा आपुल्या द्या पादुका
मागणें हें एक रामा आपुल्या द्या पादुका

घेतला मी वेष मुनिचा सोडतांना देश तो
कैकयीसा घेउं माथीं का प्रजेचा रोष तो
काय आज्ञा आगळी ही तुम्हिच देतां बालका
मागणें हें एक रामा आपुल्या द्या पादुका

पादुका या स्थापितों मी दशरथांच्या आसनीं
याच देवी राज्यकर्त्या कोसलाच्या शासनीं
चरणचिन्हें पूजुनीं हीं साधितों मी सार्थका
मागणें हें एक रामा आपुल्या द्या पादुका

राम नाहीं चरणचिन्हें राहुं द्या ही मंदिरीं
राम नाहीं चरणचिन्हें राहुं द्या ही मंदिरीं
नगरसीमा सोडुनी मी राहतों कोठें तरी
भास्कराच्या किरणरेखा सांध्यकाळीं दीपिका
मागणें हें एक रामा आपुल्या द्या पादुका
मागणें हें एक रामा आपुल्या द्या पादुका

चालवीतों राज्य रामा दुरुन तुम्ही येइतों
चालवीतों राज्य रामा दुरुन तुम्ही येइतों
मोजितों संवत्सरें मी वाट तुमची पाहतों
नांदतों राज्यांत तीर्थीं कमलपत्रासारखा
मागणें हें एक रामा आपुल्या द्या पादुका

सांगतां तेव्हां न आले चरण जर का मागुती
सांगतां तेव्हां न आले चरण जर का मागुती
त्या क्षणीं या तुच्छ तनुची अग्‍निदेवा आहुती
ही प्रतिज्ञा ही कपाळीं ही प्रतिज्ञा ही कपाळीं पाऊलांची मृत्तिका
मागणें हें एक रामा आपुल्या द्या पादुका
मागणें हें एक रामा आपुल्या द्या पादुका

Curiosità sulla canzone Taat Gele Maye Geli di सुधीर फडके

Chi ha composto la canzone “Taat Gele Maye Geli” di di सुधीर फडके?
La canzone “Taat Gele Maye Geli” di di सुधीर फडके è stata composta da G. D. Madgulkar.

Canzoni più popolari di सुधीर फडके

Altri artisti di