Stree Janma Hi Tujhi Kahani
स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी
स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी
हृदयी अमृत नयनी पाणी
हृदयी अमृत नयनी पाणी
तुझिया पोटी अवतरती नर
अन्यायच ते करिती तुझ्यावर
दासी म्हणुनी नमविती चरणी
दासी म्हणुनी नमविती चरणी
स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी
हृदयी अमृत नयनी पाणी
हृदयी अमृत नयनी पाणी
कुशीत तुझिया पुरुष धुरंधर
अबला परि तू ठरिसी जगावर
दशा तुझी ही केविलवाणी
दशा तुझी ही केविलवाणी
स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी
हृदयी अमृत नयनी पाणी
हृदयी अमृत नयनी पाणी
सुंदरता तुज दिधली देवे
सुंदरता तुज दिधली देवे
तुझी तुला ती परि न पेलवे
क्षणांत ठरली तूच पापिणी
क्षणांत ठरली तूच पापिणी
स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी
स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी
हृदयी अमृत नयनी पाणी
हृदयी अमृत नयनी पाणी
स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी