Soor Gele Door Aata
सूर गेले दूर आता शब्द मागे राहिला
चंद्र होता साक्षीला चंद्र होता साक्षीला
चंद्र होता साक्षीला चंद्र होता साक्षीला
पाहिले भेटलो बोललो प्रीतीने
पौर्णिमा लाजली हासले चांदणे
प्राण हे छेडुनी राग मी गाईला
चंद्र होता साक्षीला चंद्र होता साक्षीला
भावना अंतरी वेदना जाहली
प्रीत मी पहिली रीत मी साहिली
थांबली आसवे हुंदका थांबला
चंद्र होता साक्षीला चंद्र होता साक्षीला
चंद्र तो रात्र ती श्वास तो मोकळा
आज ते संपले शून्य मी एकला
त्याग मी भोगिता स्नेह का भंगला
चंद्र होता साक्षीला चंद्र होता साक्षीला