Santh Wahate Krishna Mai
संथ वाहते कृष्णामाई
संथ वाहते कृष्णामाई
तीरावरल्या सुखदुःखाची
तीरावरल्या सुखदुःखाची जाणीव तिजला नाही
संथ वाहते कृष्णामाई
कुणी नदीला म्हणती माता
कुणी नदीला म्हणती माता कुणी मानिती पूज्य देवता
कुणी मानिती पूज्य देवता
पाषाणाची घडवुन मूर्ती
घडवुन मूर्ती पूजित कुणी राही
संथ वाहते कृष्णामाई
संथ वाहते कृष्णामाई
सतत वाहते उदंड पाणी
उदंड पाणी कुणी न वळवुन नेई रानी
आळशास ही व्हावी कैसी
व्हावी कैसी गंगा फलदायी
संथ वाहते कृष्णामाई
तीरावरल्या सुखदुःखाची जाणीव तिजला नाही
संथ वाहते कृष्णामाई