Ravi Aala Ho
आभाळाच्या देवघरी हा उष:काल झाला
उष:काल झाला
रवि आला हो रवि आला रवि आला
रवि आला हो रवि आला रवि आला
झाडे पाने फुलवेली हो
थेंब दंवाचे ल्याली हो
झाडे पाने फुलवेली हो
थेंब दंवाचे ल्याली हो
प्रभातकाळी निसर्गराजा उजेडात न्हाला
रवि आला हो रवि आला रवि आला
कवाड अंगण उजळावे
फुलासवे मन उमलावे
कवाड अंगण उजळावे
फुलासवे मन उमलावे
हसली सदने हसली वदने तम विरुनी गेला
रवि आला हो रवि आला रवि आला
करू आरती तेजाची
तेजाची रविराजाची
मंगल ऐका मंगल देखा मंगलमय बोला
रवि आला हो रवि आला