Nakos Nauke Parat Phiru

Sudhir Phadke, G D Madgulkar

नगरजनांची आर्थप्राथाना श्री रामांचा रथ अडवू शकले नाही
बंधू लक्ष्मण आणि पत्नी जानकी यांच्या सह श्री राम अयोध्येच्या बाहेर पडले
त्या रात्री अयोध्येतील कुठल्याही घरी अग्नी प्रज्वलित झाला नाही
दिवे लागले नाहीत अन्न शिजले नाही
उदक नाहीसे झालेल्या समुद्रासारखे ती लघूनगरी भकास झाली
श्री रामांनी सीमेबाहेर गेल्यावर
अयोध्येच्या दिशेला मुख करून तिला अभिवादन केले
आणि तेथ पर्यंत आलेल्या नागरिकांना निरोप दिला
रथ मार्ग आक्रमू लागला
श्री राम गंगातीरी शिगवेरपुरात आले
निषाधारीपती गुहानं श्री रामाचं दर्शन घेतले
आणि अत्यंत भक्तीने त्यांचे आदरातिथ्य केलं
ती रात्र सर्वांनी एका इंगुदी वृक्षाखाली काढली
दिवस उजाडल्यावर गुहानं नौका सिद्ध केली
श्री रामांनी सुमंताला अयोध्याला परत जाण्याची आज्ञा केली
आपण सीता लक्ष्मणासह नौकेमध्ये चढले
नावांणि नौका वल्लभू लागले
लाटा वर लाटा आदळू लागल्या
आणि नौका वल्हवता वल्हवता
गुहासह त्याच्या नावांणे गाऊ लागले म्हणू लागले

नकोस नौके परत फिरूं ग नकोस गंगे ऊर भरूं
नकोस नौके परत फिरूं ग नकोस गंगे ऊर भरूं
श्रीरामांचे नाम गात या श्रीरामाला पार करूं

जय गंगे जय भागिरथी
जय जय राम दाशरथी
जय गंगे
जय जय राम
जय गंगे जय भागिरथी
जय जय राम दाशरथी

ही दैवाची उलटी रेघ
माथ्यावरचा ढळवूं मेघ
ही दैवाची उलटी रेघ
माथ्यावरचा ढळवूं मेघ
भाग्य आपुलें अपुल्या हातें अपुल्यापासुन दूर करूं
अपुल्यापासुन दूर करूं
श्रीरामांचे नाम गात या श्रीरामाला पार करूं
जय गंगे जय भागिरथी
जय जय राम दाशरथी
जय गंगे
जय जय राम

श्री विष्णूचा हा अवतार
भव-सिंधूच्या करतो पार
श्री विष्णूचा हा अवतार
भव-सिंधूच्या करतो पार
तारक त्याला तारुन नेऊं पदस्पर्षांनें सर्व तारुं
पदस्पर्षांनें सर्व तारुं
श्रीरामांचे नाम गात या श्रीरामाला पार करूं
जय गंगे जय भागिरथी
जय जय राम दाशरथी
जय गंगे
जय जय राम

जिकडे जातो राम नरेश
सुभग सुभग तो दक्षिण देश
जिकडे जातो राम नरेश
सुभग सुभग तो दक्षिण देश
ऐल अयोध्या पडे अहल्या पैल उगवतिल कल्पतरू
पैल उगवतिल कल्पतरू
श्रीरामांचे नाम गात या श्रीरामाला पार करूं
जय गंगे जय भागिरथी
जय जय राम दाशरथी
जय गंगे
जय जय राम

कर्तव्याची धरुनी कांस
राम स्वीकरी हा वनवास
कर्तव्याची धरुनी कांस
राम स्वीकरी हा वनवास
दासच त्याचे आपण कां मग कर्तव्यासी परत सरूं
कां मग कर्तव्यासी परत सरूं
श्रीरामांचे नाम गात या श्रीरामाला पार करूं
जय गंगे जय भागिरथी
जय जय राम दाशरथी
जय गंगे
जय जय राम

अतिथि असो वा असोत राम
पैल लाविणे अपुलें काम
पैल लाविणे अपुलें काम
पैल लाविणे अपुलें काम
अतिथि असो वा असोत राम
पैल लाविणे अपुलें काम
भलेंबुरें तें राम जाणता
भलेंबुरें तें राम जाणता आपण अपुलें काम करूं
आपण अपुलें काम करूं
श्रीरामांचे नाम गात या श्रीरामाला पार करूं
जय गंगे जय भागिरथी
जय जय राम दाशरथी
जय गंगे
जय जय राम

गंगे तुज हा मंगल योग
भगिरथ आणि तुझा जलौघ
गंगे तुज हा मंगल योग
भगिरथ आणि तुझा जलौघ
त्याचा वंशज नेसी तूंही-दक्षिण देशा अमर करूं
दक्षिण देशा अमर करूं
श्रीरामांचे नाम गात या श्रीरामाला पार करूं
जय गंगे जय भागिरथी
जय जय राम दाशरथी
जय गंगे
जय जय राम

पावन गंगा पावन राम
श्रीरामांचें पावन नाम
पावन गंगा पावन राम
श्रीरामांचें पावन नाम
त्रिदोषनाशी प्रवास हा प्रभु नाविक आम्ही नित्य स्मरूं
नाविक आम्ही नित्य स्मरूं
श्रीरामांचे नाम गात या श्रीरामाला पार करूं
जय गंगे जय भागिरथी
जय जय राम दाशरथी
जय गंगे
जय जय राम
जय गंगे जय भागिरथी
जय जय राम दाशरथी
जय गंगे जय भागिरथी
जय जय राम दाशरथी
जय गंगे जय भागिरथी
जय जय राम दाशरथी

Curiosità sulla canzone Nakos Nauke Parat Phiru di सुधीर फडके

Chi ha composto la canzone “Nakos Nauke Parat Phiru” di di सुधीर फडके?
La canzone “Nakos Nauke Parat Phiru” di di सुधीर फडके è stata composta da Sudhir Phadke, G D Madgulkar.

Canzoni più popolari di सुधीर फडके

Altri artisti di