Nako Re Jau
रामांनी जाऊ नये
म्हणून त्यांना पोटाशी धरून कौशल्याने कितीही आक्रोश केला
तरी रामांचा निश्चय काही बदलला नाही
उलट त्यांनी तिला समजावून सांगितले कि आई
यावेळेला तुझे कर्तव्य असे आहे
कि पुत्र प्रेम तू बाजूला ठेवावस
आणि माझ्या वडिलांच्या अत्यंत दुतसह आणि दारुण अवस्थेमध्ये
तू याच ठिकाणी राहावस त्यांना धीर द्यावासा त्यांचे सांपन करावस
कारण मला हे माहित आहे
कि त्यांनी हा जो निर्णय घेतला आहे तो पूर्णपणे स्वतःच्या इच्छेविरुद्ध घेतला आहे
आणि याच्या त्यांना काय यातना होत असतील त्याची पण मला पूर्णपने कल्पना आहे
पित्याच्या वाचनाचे पालन करणे हे पुत्र म्हणून माझे कर्त्यव्यच नाही का आई
स्थिर डोळ्यांनी हे सगळे पाहत असलेल्या लक्ष्मणाला मात्र आता आहे सहन होईना
तो संतापून म्हणाला
रामाविण राज्यपदीं कोण बैसतो
रामाविण राज्यपदीं कोण बैसतो
घेउनियां खड्ग करीं मीच पाहतो
घेउनियां खड्ग करीं मीच पाहतो
रामाविण राज्यपदीं कोण बैसतो
श्रीरामा तूं समर्थ
मोहजालिं फससि व्यर्थ
श्रीरामा तूं समर्थ
मोहजालिं फससि व्यर्थ
पाप्यांचे पाप तुला उघड सांगतो
पाप्यांचे पाप तुला उघड सांगतो
रामाविण राज्यपदीं कोण बैसतो
वरहि नव्हे वचन नव्हे
कैकयिला राज्य हवें
वरहि नव्हे वचन नव्हे
कैकयिला राज्य हवें
विषयधुंद राजा तर तिजसि मानतो
विषयधुंद राजा तर तिजसि मानतो
रामाविण राज्यपदीं कोण बैसतो
वांच्छिति जे पुत्रघात
ते कसले मायतात
वांच्छिति जे पुत्रघात
ते कसले मायतात
तुज दिधला शब्द कसा नृपति मोडतो
तुज दिधला शब्द कसा नृपति मोडतो
रामाविण राज्यपदीं कोण बैसतो
लंपट तो विषयिं दंग
तुजसि करी वचनभंग
लंपट तो विषयिं दंग
तुजसि करी वचनभंग
भार्येचा हट्ट मात्र निमुट पाळितो
भार्येचा हट्ट मात्र निमुट पाळितो
रामाविण राज्यपदीं कोण बैसतो
घेउनियां खड्ग करीं मीच पाहतो
रामाविण राज्यपदीं कोण बैसतो
वर दिधलें कैकयीस
आठवले या मितीस
वर दिधलें कैकयीस
आठवले या मितीस
आजवरी नृपति कधी बोलला न तो
आजवरी नृपति कधी बोलला न तो
रामाविण राज्यपदीं कोण बैसतो
मत्त मतंगजापरी
दैव तुझें चाल करी
मत्त मतंगजापरी
दैव तुझें चाल करी
श्रीरामा मीच त्यास दोर लावितो
श्रीरामा मीच त्यास दोर लावितो
रामाविण राज्यपदीं कोण बैसतो
बैस तूंच राज्यपदीं
आड कोण येइ मधीं
बैस तूंच राज्यपदीं
आड कोण येइ मधीं
येउं देत कंठस्नान त्यास घालितो
येउं देत कंठस्नान त्यास घालितो
रामाविण राज्यपदीं कोण बैसतो
येउं देत तिन्ही लोक
घालिन मी त्यांस धाक
येउं देत तिन्ही लोक
घालिन मी त्यांस धाक
पाहूं देच वृद्ध पिता काय योजितो
पाहूं देच वृद्ध पिता काय योजितो
रामाविण राज्यपदीं कोण बैसतो
शत शतके पाळ धरा
श्रीरामा चापधरा
शत शतके पाळ धरा
श्रीरामा चापधरा
रक्षणासि पाठीं मी नित्य राहतों
रक्षणासि पाठीं मी नित्य राहतों
रामाविण राज्यपदीं कोण बैसतो
येइल त्या करिन सजा
बंधू नच दास तुझा
येइल त्या करिन सजा
बंधू नच दास तुझा
मातु:श्री कौसल्येशपथ सांगतो
मातु:श्री कौसल्येशपथ सांगतो
रामाविण राज्यपदीं कोण बैसतो
घेउनियां खड्ग करीं मीच पाहतो
रामाविण राज्यपदीं कोण बैसतो