Lala Jivhala Shabdach Khote
लळा जिव्हाला शब्दच खोटे
लळा जिव्हाला शब्दच खोटे माश्या मासा खाई
कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही
कुणी कुणाचे नाही
लळा जिव्हाला शब्दच खोटे
पिसे टनासाडी काड्या जमावी चिमणी बांधी कोते
दाणा दाणा आणून जगवी जीव कोवळे छोटे
बळावत बळ पंखामधले पिल्लू उडुनी जाई
कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही
कुणी कुणाचे नाही
लळा जिव्हाला शब्दच खोटे
रक्त हि जेथे सूद साधते तेथे कसली माया
कोण कुणाची बहीण भाऊ पती पुत्र वा जाया
सांगायाची नाती सगळी जो तो आपुले पाही
कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही
कुणी कुणाचे नाही
कुणी कुणाचे नाही