Kuthe Shodhisi Rameshwar

Mangesh Padgaonkar, Yeshwant Deo

कुठे शोधिसी रामेश्वर
कुठे शोधिसी काशी
कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी

हृदयातिल भगवंत राहिला
हृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी
कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी
कुठे शोधिसी रामेश्वर

झाड फुलांनी आले बहरून तू न पाहिले डोळे उघडुन

वर्षाकाळी पाउसधारा तुला न दिसला त्यात इषारा

काय तुला उपयोग आंधळ्या
काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून उशाशी
कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी
कुठे शोधिसी रामेश्वर

रुद्राक्षांच्या गळ्यात माळा लाविलेस तू भस्म कपाळा

कधी न घेउन नांगर हाती पिकविलेस मातीतुन मोती

हाय अभाग्या भगवे नेसून
हाय अभाग्या भगवे नेसून घर संन्यासुन जाशी
कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी
कुठे शोधिसी रामेश्वर
देव बोलतो बाळमुखातुन देव डोलतो उंच पिकांतुन

कधी होउनी देव भिकारी अन्नासाठी आर्त पुकारी

अवतीभवती असुन दिसेना
अवतीभवती असुन दिसेना शोधितोस आकाशी
कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी
कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी
हृदयातिल भगवंत राहिला
हृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी
कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी
कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी
कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी

Curiosità sulla canzone Kuthe Shodhisi Rameshwar di सुधीर फडके

Chi ha composto la canzone “Kuthe Shodhisi Rameshwar” di di सुधीर फडके?
La canzone “Kuthe Shodhisi Rameshwar” di di सुधीर फडके è stata composta da Mangesh Padgaonkar, Yeshwant Deo.

Canzoni più popolari di सुधीर फडके

Altri artisti di