Kon Tu Kuthala Rajkumar

G D MADGULKAR, SUDHIR V PHADKE

भारताने अत्यंत अकुलतेने मागितलेला हे धान
श्री राम नाकारू शकले नाही
श्री रामाच्या चरण धुळीने पावन झालेल्या त्या सुवर्ण मंडित पादुका
भारताने हाती वरून मिरवत मिरवत अयोध्याला नेह्ल्या
त्या पादुकास्थानी राजयभिषेक करवला आणि स्वःता
त्यांच्या राज्याचा कारभारी महणून राज्य कारोभार पाहू लागला
इकडे रामाणी चित्रकून सोडला
प्रवास करी करीत ते दक्षिणेला निघाले
वाटते कुयेताभवानी विराद नामक राक्षसाचा वाद केला
शरभंगा आश्रमी जाऊन त्या स्वरलॉक गामी चा दर्शन घेतला
शरभंगा आश्रमीच काही ऋषी जणांनी रामाला नम्र विनंती केली
आश्रमवासी मुनीरजणांचे काही रक्षाकांकडून अनर्विक छळ होत आहे
आपण समर्थ आहेत राजे आहेत धार्मिकांचा रक्षण करा
हेयावर सर्वज्ञन राम विनयनं आणि निच्याना बोले तपस्वी
जणांचे चार शत्रू राक्षस हॅयांची नायनाट करण्याची माझी ईच्छा आहे
आपण निश्चिन्त असावा
रिषीना असे वाचन देऊन श्री राम फुडें संचार करू लागले
शुतीशश्रमसरोवर्थ पांचांसरोवर ह्या भागात त्याने दहा वर्ष आनंदाने संचार केला
नंतर शुध्दिस्टनच्या आज्ञे वरून त्याने अगस्थ आश्रमाचा मार्ग धरला
सुतीक्ष्ण आणि अगस्थी ह्या महर्षी ने राम लक्समन ला दैवी अयोध्या अर्पण केली
दहा वर्ष नंतर श्री राम गोदावरी जाठावर पंचवटीत आले
त्या मानहोर वन प्रदेशात त्यांची कोटी अत्यंत शोभून दिसू लागली
एकदा हेयच पर्ण शाळेच्या ओट्यावर
श्री राम जानकी लक्ष्मणासह सह वार्ता विनोद करीत असताना
एक अद्भुत स्त्री आश्रमाच्या अंगणात अली
अनोळखीत सारखी अंग एक्पशेत करत
धुंद डोळ्यांनी ती नेंहळू लागली
हलके हलके मंजुळ स्वर कडून ती रामांशी बोलू लागली ती म्हणाली

कोण तूं कुठला राजकुमार कुठला राजकुमार
कोण तूं कुठला राजकुमार कुठला राजकुमार
देह वाहिला तुला श्यामला
देह वाहिला तुला श्यामला कर माझा स्वीकार
कोण तूं कुठला राजकुमार कुठला राजकुमार

तुझ्या स्वरूपीं राजलक्षणें
रुद्राक्षांची श्रवणिं भूषणें
तुझ्या स्वरूपीं राजलक्षणें
रुद्राक्षांची श्रवणिं भूषणें
योगी म्हणुं तर तुझ्या भोंवती वावरतों परिवार
कोण तूं कुठला राजकुमार कुठला राजकुमार

काय कारणें वनिं या येसी
काय कारणें वनिं या येसी
असा विनोदें काय हांससी
ज्ञात नाहिं का येथ आमुचा अनिर्बंध अधिकार
कोण तूं कुठला राजकुमार कुठला राजकुमार

शूर्पणखा मी रावणभगिनी
याच वनाची समज स्वामिनी
शूर्पणखा मी रावणभगिनी
याच वनाची समज स्वामिनी
अगणित रूपें घेउन करितें
अगणित रूपें घेउन करितें वनोवनीं संचार
कोण तूं कुठला राजकुमार कुठला राजकुमार

तुजसाठिं मी झालें तरुणी
षोडषवर्षा मधुरभाषिणी
तुजसाठिं मी झालें तरुणी
षोडषवर्षा मधुरभाषिणी
तुला पाहतां मनांत मन्मथ जागुन दे हुंकार
कोण तूं कुठला राजकुमार कुठला राजकुमार

तव अधरांची लालस कांती
तव अधरांची लालस कांती
पिऊं वाटतें मज एकान्‍ती
स्मरतां स्मर का अवतरसी तूं अनंग तो साकार
कोण तूं कुठला राजकुमार कुठला राजकुमार

मला न ठावा राजा दशरथ
मनांत भरला त्याचा परि सुत
मला न ठावा राजा दशरथ
मनांत भरला त्याचा परि सुत
प्राणनाथ हो माझा रामा
प्राणनाथ हो माझा रामा करु सौख्यें संसार
कोण तूं कुठला राजकुमार कुठला राजकुमार

तुला न शोभे ही अर्धांगी
तुला न शोभे तुला न शोभे ही अर्धांगी
दूर लोट ती कुरुप कृशांगी
समीप आहे तुझ्या तिचा मी क्षणिं करितें संहार
कोण तूं कुठला राजकुमार कुठला राजकुमार

माझ्यासंगे राहुनि अविरत
पाळ तुझें तूं एकपत्‍निव्रत
माझ्यासंगे राहुनि अविरत
पाळ तुझें तूं एकपत्‍निव्रत
अलिंगनाची आस उफाळे तनूमनीं अनिवार
कोण तूं कुठला राजकुमार कुठला राजकुमार
कोण तूं कुठला राजकुमार कुठला राजकुमार

Curiosità sulla canzone Kon Tu Kuthala Rajkumar di सुधीर फडके

Chi ha composto la canzone “Kon Tu Kuthala Rajkumar” di di सुधीर फडके?
La canzone “Kon Tu Kuthala Rajkumar” di di सुधीर फडके è stata composta da G D MADGULKAR, SUDHIR V PHADKE.

Canzoni più popolari di सुधीर फडके

Altri artisti di