Kashi Nashibana Thatta Aaj Mandali
दहा दिशांनी दहा मुखांनी आज फोडिला टाहो
आसवांत या भिजली गाथा श्रोते एका हो
माझ्या काळजाची तार आज छेडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली
माझ्या काळजाची तार आज छेडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली
गंगेवानी निर्मळ होता असा एक गाव असा एक गाव
सुखी समाधानी होता रंक आणि राव रंक आणि राव
त्याची गुण गौरवान कीर्ती वाढली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली
अशा गावी होता एक भोळा भाग्यवंत भोळा भाग्यवंत
पुण्यवान म्हणती त्याला कुणी म्हणे संत कुणी म्हणे संत
त्याला एका मेनकेची दृष्टी लागली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली
सत्वशील चारित्र्याची घालमेल झाली घालमेल झाली
गावासाठी नर्तकीला नदीपार केली नदीपार केली
नार सूड भावनेना उभी पेटली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली
जाब विचारया गेला तिने केला डाव तिने केला डाव
भोवरयात शृंगाराच्या सापडली नाव सापडली नाव
त्याच्या पतंगाची दोरी तिने तोडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली
नाही नाही कशी नशीबाने थट्टा आज मांडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली