June Phekuni Navin Ghya

Sudhir Phadke, G D Madgulkar, SUDHIR V PHADKE

नगरवासिनो या हो या
नगरवासिनो या हो या
तुम्ही या हो या
जुने फेकुनि नवीन घ्या
जुने फेकुनि नवीन घ्या
नगरवासिनो या हो या

जगावेगळा हा व्यापार
दानासाठी हा व्यवहार
जगावेगळा हा व्यापार
दानासाठी हा व्यवहार
पेठ लुटनी सारी न्या सारी न्या सारी न्या
जुने फेकुनि नवीन घ्या
नगरवासिनो या हो या
नगरवासिनो या हो या
तुम्ही या हो या तुम्ही या हो या
जुने फेकुनि नवीन घ्या

आणा फेका मळके लक्तर
घेऊनि जा हो दुकूल पितांबर
आणा फेका मळके लक्तर
घेऊनि जा हो दुकूल पितांबर
फुटके टाका थडके घ्या
थडके घ्या थडके घ्या थडके घ्या
जुने फेकुनि नवीन घ्या
नगरवासिनो या हो या
नगरवासिनो या हो या
तुम्ही या हो या तुम्ही या हो या
जुने फेकुनि नवीन घ्या

नक्षीदार ही पात्रे सुंदर पात्रे सुंदर
मुक्तकरे घ्या हिरे जवाहिर हिरे जवाहिर हिरे जवाहिर
दैन्य देउनी सौख्ये घरी न्या सौख्ये घरी न्या
जुने फेकुनि नवीन घ्या
नगरवासिनो या हो या
तुम्ही या हो या तुम्ही या हो या
जुने फेकुनि नवीन घ्या

उघडे लक्ष्मीचे उद्यान
स्वर्णसंधीचा राखा मान राखा मान
उघडे लक्ष्मीचे उद्यान
स्वर्णसंधीचा राखा मान राखा मान
सान-थोर या नर-नारी या
सान-थोर या नर-नारी या नर-नारी या नर-नारी या
सान-थोर या नर-नारी या
जुने फेकुनि नवीन घ्या
जुने फेकुनि नवीन घ्या
जुने फेकुनि नवीन घ्या नवीन घ्या नवीन घ्या नवीन घ्या नवीन घ्या

Curiosità sulla canzone June Phekuni Navin Ghya di सुधीर फडके

Chi ha composto la canzone “June Phekuni Navin Ghya” di di सुधीर फडके?
La canzone “June Phekuni Navin Ghya” di di सुधीर फडके è stata composta da Sudhir Phadke, G D Madgulkar, SUDHIR V PHADKE.

Canzoni più popolari di सुधीर फडके

Altri artisti di