Ja Shodh Ja Kinara
जा शोध जा किनारा
जा शोध जा किनारा
जीवननौका गोते खाई झुरतो जीव बिचारा
जा शोध जा किनारा
गहिवरल्या हृदयात जळावी अश्रृमधली गाणी
थरथरत्या ओठात विरावी हळवी आर्त विराणी
निराधार ही सुता धरेची कोठे आज निवारा
जा शोध जा किनारा
जीवननौका गोते खाई झुरतो जीव बिचारा
जा शोध जा किनारा
धरणीच्या उदरात फुटावी जलतृष्णेची लाही
झडली पानफुलांची माया छाया कुणी न देई
अनोळखी या दैवगतीचा भासे शून्य पसारा
जा शोध जा किनारा
वादळवारा काजळधारा गिळति डोंगरलाटा
पुसून गेल्या वाळु वरल्या ओल्या पाऊलवाटा
डोळ्यापुढती गिरक्या घेई दाही दिशांची कारा
जा शोध जा किनारा
जीवननौका गोते खाई झुरतो जीव बिचारा
जा शोध जा किनारा
जा शोध जा किनारा