Gelis Sodunini Ka

G.D. MADGULKAR, YASHWANT DEO

गेलीस सोडुनी का दाक्षायणी शिवांगी
गेलीस सोडुनी का दाक्षायणी शिवांगी
अमरत्व शाप आहे मजसी तुझ्या वियोगी
गेलीस सोडुनी का दाक्षायणी शिवांगी

देवी तुझ्याविना मी देहा धरू कशाला
नारीविना जगी ना सामर्थ्य पौरुषाला
सामर्थ्य पौरुषाला
अर्धांग भस्म झाले अर्धाच मी अभागी
अमरत्व शाप आहे मजसी तुझ्या वियोगी
गेलीस सोडुनी का दाक्षायणी शिवांगी

विसरू कसा सखे मी आनंद भोगलेला
घर शैल कंदरीचे गिरीशीर्ष चंद्रशाला
संसार सौख्यदायी सहवास सप्तरंगी
अमरत्व शाप आहे मजसी तुझ्या वियोगी
गेलीस सोडुनी का दाक्षायणी शिवांगी
गेलीस सोडुनी का
ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय
ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय
ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय
ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय

Curiosità sulla canzone Gelis Sodunini Ka di सुधीर फडके

Chi ha composto la canzone “Gelis Sodunini Ka” di di सुधीर फडके?
La canzone “Gelis Sodunini Ka” di di सुधीर फडके è stata composta da G.D. MADGULKAR, YASHWANT DEO.

Canzoni più popolari di सुधीर फडके

Altri artisti di