Dolyamadhale Aasoo
कधी बहर कधी शिशिर परंतु दोन्ही एक बहाणे
डोळ्यांमधले आसू पुसती ओठांवरले गाणे
डोळ्यांमधले आसू पुसती ओठांवरले गाणे
ओठांवरले गाणे
बहर धुंद वेलीवर यावा
हळुच लाजरा पक्षी गावा पक्षी गावा
बहर धुंद वेलीवर यावा
हळुच लाजरा पक्षी गावा पक्षी गावा
आणि अचानक गळुन पडावी
आणि अचानक गळुन पडावी विखरुन सगळी पाने
डोळ्यांमधले आसू पुसती ओठांवरले गाणे
ओठांवरले गाणे
भान विसरुनी मिठी जुळावी
पहाट कधी झाली न कळावी
भान विसरुनी मिठी जुळावी
पहाट कधी झाली न कळावी
भिन्न दिशांना झुरत फिरावे
भिन्न दिशांना झुरत फिरावे नंतर दोन दिवाणे
डोळ्यांमधले आसू पुसती ओठांवरले गाणे
ओठांवरले गाणे
हळुच फुलाच्या बिलगुनि गाली
नाजुक गाणी कुणी गायिली
हळुच फुलाच्या बिलगुनि गाली
नाजुक गाणी कुणी गायिली
आता उरली आर्त विराणी
आता उरली आर्त विराणी सूरच केविलवाणे
डोळ्यांमधले आसू पुसती ओठांवरले गाणे
ओठांवरले गाणे
जुळली हृदये सूर ही जुळले
तुझे नि माझे गीत तरळले गीत तरळले
जुळली हृदये सूर ही जुळले
तुझे नि माझे गीत तरळले गीत तरळले
व्याकुळ डोळे कातरवेळ
व्याकुळ डोळे कातरवेळ स्मरुन आता जाणे
आ आ आ आ आ हं हं हं हं