Dohale Purava Raghukultilaka Majhe

G D MADGULKAR, SUDHIR V PHADKE

हनुमंताच्या इच्छेप्रमाणे श्री रामाने त्यांना इच्छित वर दिला
राम कथा आणि हनुमंत दोघेही चिरंजीव झाले
परंतु श्रीरामांच लीळाचरित्र अद्याप संपलं होत कुठे
श्री राम राज्य करू लागल्या पासून पृथ्वी वर स्वर्ग नांदू लागलाय
आनंद वाचून सुख वाचून या अवनी वरती अन्य काही उरलेच नाही आहे
देवता तुल्य असलेली जानकी अतिशय सुखा मध्ये आहे
असेच एकदा श्री राम आणि जानकी कुबेराच्या चैतररथ वनसारख्या
त्यांच्या अत्यंत निसर्ग संपन्न अशा अशोक वनामध्ये बसलेले असताना
जानकीची फिकट अंग कांती आणि आळसावलेली देह लता पाहून
श्रीरामाने हसत विचारलं जानकी तुला काई हवं हवंस वाटतंय का
भरतयाचा प्रश्न जानकीला उमगला
मंद स्मित करून ती विदेह राजकन्या श्रीरामाला म्हणाली

ओठांत थांबुनी सशब्द आशा लाजे
डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे
ओठांत थांबुनी सशब्द आशा लाजे
डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे
मज उगा वाटतें वनीं विहारा जावें
पांखरांसारखे मुक्त स्वरांनीं गावें
कानांत बासरी वंशवनांतिल वाजे
डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे

वाटतें धरावें कुशींत पाडस भोळें
मज आवडती ते विशाल निर्मळ डोळे
चुंबीन त्यास मी भरविन चारा चोजें
डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे
डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे

वल्कलें भिजावीं जळांत माझीं सारीं
घागरी कटिवर करांत घ्यावी झारी
मस्तकीं असावें दुजा घटाचें ओझें
डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे
डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे

वाटतें खणावें कंदमुळें काढावीं
तीं हलक्या हातें लीलेनें सोलावीं
चाखून बघावें अमृतान्‍न तें ताजें
डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे
डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे

सांजेस बसावें आम्रतरूच्या खालीं
गळतील सुगंधित जधीं मंजिरी भालीं
करतील गर्जना दुरुन वनाचे राजे
डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे

घेऊन धनुतें बांधुन भाता पाठीं
वाटतें फिरावें वनांत मृगयेसाठीं
पाडीत फिरावें दिसेल श्वापद जें जें
डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे
डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे

वाटतें प्रभातीं बसुनी वेदीपाशीं
वेदांत करावा प्रकांड अध्वर्यूशी
लालिमा मुखावर यावा पावकतेजें
डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे

कां हंसतां ऐसें मला खुळीला देवा
एवढा तरी हा हट्ट गडे पुरवावा
का विनोद ऐसा प्रिया अवेळीं साजे
डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे
डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे

Curiosità sulla canzone Dohale Purava Raghukultilaka Majhe di सुधीर फडके

Chi ha composto la canzone “Dohale Purava Raghukultilaka Majhe” di di सुधीर फडके?
La canzone “Dohale Purava Raghukultilaka Majhe” di di सुधीर फडके è stata composta da G D MADGULKAR, SUDHIR V PHADKE.

Canzoni più popolari di सुधीर फडके

Altri artisti di