Dan Dilyane Dyan Vadhate
दान दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे
सत्य शिवाहुन सुंदर हे
सत्य शिवाहुन सुंदर हे
सत्य शिवाहुन सुंदर हे
सत्य शिवाहुन सुंदर हे
इथे मोल ना दामाचे मोती होतील घामाचे
इथे मोल ना दामाचे मोती होतील घामाचे
सरस्वतीच्या प्रेमाचे
सरस्वतीच्या प्रेमाचे प्रतीक रम्य शुभंकर हे
सत्य शिवाहुन सुंदर हे
चिरा चिरा हा घडवावा कळस कीर्तीचा चढवावा
चिरा चिरा हा घडवावा कळस कीर्तीचा चढवावा
अज्ञानी तो पढवावा
अज्ञानी तो पढवावा थेंब आम्ही तर सागर हे
सत्य शिवाहुन सुंदर हे
त्यागाला या नाव नसे पुण्यवान हा देश असे
त्यागाला या नाव नसे पुण्यवान हा देश असे
कल्पतरू हा उभा दिसे
कल्पतरू हा उभा दिसे त्या छायेतील मंदिर हे
सत्य शिवाहुन सुंदर हे
सत्य शिवाहुन सुंदर हे