Chandanyachya Devharyat
चंदनाच्या देव्हार्यात उभा पांडुरंग
चंदनाच्या देव्हार्यात उभा पांडुरंग
मुकेपणा आज माझा आळवी अभंग आळवी अभंग
मुकेपणा आज माझा आळवी अभंग आळवी अभंग
झिजविला देह सारा उगाळिला जन्म
सेवा हाच माझा आहे खरा देवधर्म
झिजविला देह सारा उगाळिला जन्म
सेवा हाच माझा आहे खरा देवधर्म
नका करू कुणी माझ्या समाधीचा भंग
नका करू कुणी माझ्या समाधीचा भंग
मुकेपणा आज माझा आळवी अभंग आळवी अभंग
मुकेपणा आज माझा आळवी अभंग आळवी अभंग
मातीचे गा सोने झाले सोनियाची माती
तोडिले मी धागे धागे जोडियली नाती
मातीचे गा सोने झाले सोनियाची माती
तोडिले मी धागे धागे जोडियली नाती
हातपाय असुनी मी जाहलो अपंग
मुकेपणा आज माझा आळवी अभंग आळवी अभंग
मुकेपणा आज माझा आळवी अभंग आळवी अभंग