Chala Raghava Chala

G.D. MADGULKAR, SUDHIR PHADKE

विश्वामित्रांच्या आज्ञेप्रमाणं
श्री रामाने त्राटिका राक्षसीचा वध केला
त्या वेळी देव गंधर्वाने आकाशातून पुष्पवृष्टी केली
श्री राम लक्ष्मणासह विश्वामित्र
महर्षीच्या सिद्धाश्रमी आले
यज्ञामध्ये विघ्न आणणाऱ्या मारीज राक्षसाला
श्री रामाने मानवास्त्र सोडून समुद्रामध्ये बुडवून दिलं
अग्नि अस्त्रांन सुभाहूचा वध केला
आणि विश्वामित्रांचा यज्ञ यथासांग पार पडला
याचवेळी मिथिल अधिपती जनक राजाकडे
एक मोठा यज्ञ होणार होता
महर्षी विश्वामित्र आणि त्यांच्या आश्रमामधले आश्रमीय
त्या यज्ञासाठी मिथिलेला जायची तयारी करू लागले
राम लक्ष्मणाने आपल्या बरोबर यावं
म्हणून ते त्यांनाही पण आग्रह करू लागले
चला राघवा चला
चला राघवा चला
पहाया जनकाची मिथिला
पहाया जनकाची मिथिला

मिथिलेहुनिही दर्शनीय नृप
राजर्षी तो जनक नराधिप
नराधिपें त्या नगरीमाजीं यज्ञ नवा मांडिला
चला राघवा चला
पहाया जनकाची मिथिला
पहाया जनकाची मिथिला
मिथिलेहुनिही दर्शनीय नृप
राजर्षी तो जनक नराधिप
नराधिपें त्या नगरीमाजीं यज्ञ नवा मांडिला
चला राघवा चला
पहाया जनकाची मिथिला

यज्ञमंडपी सुनाभ कार्मुक
ज्यास पेलता झाला त्र्यंबक
त्र्यंबक देवे त्याच धनूनें त्रिपुरासुर मारिला
चला राघवा चला
पहाया जनकाची मिथिला

शिवधनुतें त्या सदनीं ठेवुन
शिवधनुतें त्या सदनीं ठेवुन
जनक तयाचें करितो पूजन
पूजनीय त्या विशाल धनुला जगांत नाहीं तुला
चला राघवा चला
पहाया जनकाची मिथिला

देशदेशिंचे नृपती येउन
स्तिमित जाहले धनुष्य पाहुन
पाहतांच तें उचलायाचा मोह तयां जाहला
चला राघवा चला
पहाया जनकाची मिथिला
पहाया जनकाची मिथिला

देव दैत्य वा सुर नर किन्नर
देव दैत्य वा सुर नर किन्नर
उचलुं न शकले त्यास तसूभर
तसूभरी ना सरलपणा त्या
तसूभरी ना सरलपणा त्या चापाचा वांकला
चला राघवा चला
पहाया जनकाची मिथिला

कोण वांकवुन त्याला ओढिल
प्रत्यंचा त्या धनूस जोडिल
सोडिल त्यांतुन बाण असा तर कोणी ना जन्मला
चला राघवा चला
पहाया जनकाची मिथिला
पहाया जनकाची मिथिला

उपजत योद्धे तुम्ही धनुर्धर
निजनयनीं तें धनू पहा तर
उपजत योद्धे तुम्ही धनुर्धर
निजनयनीं तें धनू पहा तर
बघा राघवा सौमित्री तर औत्सुक्ये दाटला
चला राघवा चला
पहाया जनकाची मिथिला

उत्साहाने निघती मुनिजन
उत्साहाने निघती मुनिजन
चला संगतीं दोघे आपण
आपण होतां सहप्रवासी
आपण होतां सहप्रवासी भाग्यतरू ये फला
चला राघवा चला
पहाया जनकाची मिथिला
पहाया जनकाची मिथिला
चला राघवा चला

Curiosità sulla canzone Chala Raghava Chala di सुधीर फडके

Chi ha composto la canzone “Chala Raghava Chala” di di सुधीर फडके?
La canzone “Chala Raghava Chala” di di सुधीर फडके è stata composta da G.D. MADGULKAR, SUDHIR PHADKE.

Canzoni più popolari di सुधीर फडके

Altri artisti di