Chal Sodun Ha Desh
आईलाही विसरून जाती या देशातील पिले अडाणी
चल सोडून हा देश पक्षिणी
चल सोडून हा देश पक्षिणी
विराण झाले अरण्य सारे
भणभण करते भीषण वारे
विराण झाले अरण्य सारे
भणभण करते भीषण वारे
दिसे न कोठे कण अन्नाचा आ आ
दिसे न कोठे कण अन्नाचा
कुठे दिसेना पाणी
चल सोडून हा देश पक्षिणी
मोडून पडली घरटी कोटी
कशी राहशील इथे एकटी
इथे न नांदे कोणी जिवलग
इथे न नांदे कोणी जिवलग
नसे आप्तही कोणी
चल सोडून हा देश पक्षिणी
उडुन उंच जा उडुन उंच जा
ऊर्ध्व दिशेला
मार्ग मानिनी अन्य न तुजला
स्वार्थाविण ना धर्म जाणिती खुळे येथले प्राणी
चल सोडून हा देश पक्षिणी
चल सोडून हा देश पक्षिणी