Bin Bhintichi Ughadi Shala
बिन भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरू
झाडे वेली पशु पाखरे यांशी गोष्टी करू
झाडे वेली पशु पाखरे यांशी गोष्टी करू
बघू बंगला या मुंग्यांचा सूर ऐकुया या भुंग्यांचा
बघू बंगला या मुंग्यांचा सूर ऐकुया या भुंग्यांचा
फुलाफुलांचे रंग दाखवील फिरते फुलपाखरू
फुलाफुलांचे रंग दाखवील फिरते फुलपाखरू
झाडे वेली पशु पाखरे यांशी गोष्टी करू
झाडे वेली पशु पाखरे यांशी गोष्टी करू
सुग्रण बांधु उलटा वाडा पाण्यावरती चाले घोडा
मासोळीसम बिन पायांचे बेडकिचे लेकरू
मासोळीसम बिन पायांचे बेडकिचे लेकरू
झाडे वेली पशु पाखरे यांशी गोष्टी करू
झाडे वेली पशु पाखरे यांशी गोष्टी करू
कसा जोंधळा रानी रुजतो उंदीरमामा कोठे निजतो
खबदाडातील खजिना त्याचा फस्त खाऊनी करू
खबदाडातील खजिना त्याचा फस्त खाऊनी करू
झाडे वेली पशु पाखरे यांशी गोष्टी करू
झाडे वेली पशु पाखरे यांशी गोष्टी करू
भल्या सकाळी उन्हात न्हाऊ कड्या दुपारी पऱ्ह्यात पोहू
भल्या सकाळी उन्हात न्हाऊ कड्या दुपारी पऱ्ह्यात पोहू
मिळेल तेथून घेउन विद्या अखंड साठा करु
मिळेल तेथून घेउन विद्या अखंड साठा करु
झाडे वेली पशु पाखरे यांशी गोष्टी करू
झाडे वेली पशु पाखरे यांशी गोष्टी करू