Bajaar Phulancha Bharala

Jagdish Khebudkar, Jog Prabhakar

बाजार फुलांचा भरला
मज तुळस दिसेना
मज बहीण मिळेना
बाजार फुलांचा भरला
मज तुळस दिसेना
ही प्रीत जगाची खोटी
मज बहीण मिळेना
मज बहीण मिळेना
बहीण मिळेना बहीण मिळेना
बाजार फुलांचा भरला
मज तुळस दिसेना

मज एक हवी ती माया
वणवणतो फिरतो वाया
मी कुठवर चालत राहू
का मार्ग सरेना
मज बहीण मिळेना
बहीण मिळेना बहीण मिळेना
बाजार फुलांचा भरला
मज तुळस दिसेना

हातात फुलांचा गजरा
वखवखल्या कामुक नजरा
या दलदल चिखलामधुनी
का कमळ फुलेना
मज बहीण मिळेना
बहीण मिळेना बहीण मिळेना
बाजार फुलांचा भरला
मज तुळस दिसेना

का आज तमाशा बघता
उघड्यावर अब्रू विकता
का किडे होऊन जगता
का जगता जगता मरता
या जगण्या मरण्यामधला
मज अर्थ कळेना
मज बहीण मिळेना
बहीण मिळेना बहीण मिळेना

Curiosità sulla canzone Bajaar Phulancha Bharala di सुधीर फडके

Chi ha composto la canzone “Bajaar Phulancha Bharala” di di सुधीर फडके?
La canzone “Bajaar Phulancha Bharala” di di सुधीर फडके è stata composta da Jagdish Khebudkar, Jog Prabhakar.

Canzoni più popolari di सुधीर फडके

Altri artisti di