Asa Ha Ekach Shri Hanuman

Sudhir Phadke, G D Madgulkar

श्री रामाने वालीचा वध केला क्रिस्टीनधींचे राज्य
पुन्हा सुग्रीवाला प्राप्त करून दिल रुमेच आणि
सुग्रीवाच मधुर मिलन झालं राज वीरासात रममाण होताच
सुग्रीवाला राम कार्याचे विसपूर्ती झाली
लक्ष्मणाने संतापून त्याला कर्त्यव्याची आठवण दिल्यास
त्याचे डोळे खाडकन उघडले आणि त्याने सर्व वानर गणांना
निमंत्रण केले सुग्रीवाच्या आज्ञेनुसार कोट्यवधी वानर एकत्र जमले
सुग्रीवाने सीता शोधार्त ते अष्ठदिशेने पाठवले श्रीरामाने हनुमंत या
वीर श्रेष्ठ वानराजवळ आपल्या बोटातील एक मुद्रिका दिली
त्याचाच हातून सीता शोधाचे कार्य निश्चित होईल असे त्यांना वाटले
वानरसेना अष्टदिशा चालू लागले दक्षिणेकडे गेलेल्या पथकात हनुमान
नील अंगद तार जांबूवान इत्यादी वीर होते अपरंपार शोध करून हि
सीतेचा ठिकाणा काही सापडला नाही तेव्हा ते कपिल श्रेष्ठ हतबल झाले
वालीपुत्र अंगद तर अगदी निराश झाले सुग्रीवाने दिलेली
महिन्याची मुदत टाळून गेली तेव्हा हि सर्व मंडळी एका पर्वतावर येऊन
हताश बसली तेव्ढ्यामध्ये संपाती नावाचा धृतराष्ट्र त्यांच्या समीप आला
तो जटायूचा भाऊ आणि दशरथांचा मित्र निघाला संपाती म्हणाला
मला येथूनच जनककन्या आणि रावण दिसत आहे
मला चक्षूमती विद्या अवगत असल्यामुळे मी हे पाहू शकतो
सीता लंकानामक स्वर्ण दीपांवर रावणाच्या अंतःपुरात बंदिवान आहे
क्षार समुद्राचा अथांग पाण्याचं उल्लंघन करण्याचा काही उपाय शोधा
अंगदाधीकाने पुष्कळ विचार केला
समुद्र उल्लंघावा कुणी शेवटी जांबूवान उठला आणि निश्चयाने म्हणाला

तरुन जो जाइल सिंधु महान
तरुन जो जाइल सिंधु महान
असा हा एकच श्रीहनुमान्
असा हा एकच श्रीहनुमान्
तरुन जो जाइल सिंधु महान
तरुन जो जाइल सिंधु महान
असा हा एकच श्रीहनुमान्
असा हा एकच श्रीहनुमान्

भुजंग धरुनी दोन्हीं चरणीं
झेपेसरशी समुद्र लंघुनि
भुजंग धरुनी दोन्हीं चरणीं
झेपेसरशी समुद्र लंघुनि
गरुड उभारी पंखां गगनीं
गरुड उभारी पंखां गगनीं
गरुडाहुन बलवान्
असा हा एकच श्रीहनुमान्
असा हा एकच श्रीहनुमान्

अंजनिचा हा बलाढ्य आत्मज
हा अनिलाचा सुपुत्र क्षेत्रज
अंजनिचा हा बलाढ्य आत्मज
हा अनिलाचा सुपुत्र क्षेत्रज
निजशक्तीनें ताडिल दिग्गज
निजशक्तीनें ताडिल दिग्गज
बलशाली धीमान्
असा हा एकच श्रीहनुमान्
असा हा एकच श्रीहनुमान्

सूर्योदयिं हा वीर जन्मला
त्रिशत योजनें नभीं उडाला
सूर्योदयिं हा वीर जन्मला
त्रिशत योजनें नभीं उडाला
समजुनिया फळ रविबिंबाला
समजुनिया फळ रविबिंबाला
धरुं गेला भास्वान्
असा हा एकच श्रीहनुमान्
असा हा एकच श्रीहनुमान्

बाल-वीर हा रवितें धरितां
भरें कापरें तीन्ही जगतां
बाल-वीर हा रवितें धरितां
भरें कापरें तीन्ही जगतां
या इवल्याशा बाळाकरितां
या इवल्याशा बाळाकरितां
वज्र धरी मघवान्
असा हा एकच श्रीहनुमान्
असा हा एकच श्रीहनुमान्

देवेंद्राच्या वज्राघातें
जरा दुखापत होय हनुतें
देवेंद्राच्या वज्राघातें
जरा दुखापत होय हनुतें
कोप अनावर येइ वायुतें
कोप अनावर येइ वायुतें
थांबे तो गतिमान्
असा हा एकच श्रीहनुमान्
असा हा एकच श्रीहनुमान्

पवन थांबता थांबे जीवन
देव वायुचें करिती सांत्वन
पवन थांबता थांबे जीवन
देव वायुचें करिती सांत्वन
पुत्रातें वर त्याच्या देउन
पुत्रातें वर त्याच्या देउन
गौरविती भगवान्
असा हा एकच श्रीहनुमान्
असा हा एकच श्रीहनुमान्

शस्त्र न छेदिल या समरांगणिं
विष्णुवरानें इच्छामरणी
शस्त्र न छेदिल या समरांगणिं
विष्णुवरानें इच्छामरणी
ज्याच्या तेजें दिपला दिनमणी
ज्याच्या तेजें दिपला दिनमणी
चिरतर आयुष्मान्
असा हा एकच श्रीहनुमान्
असा हा एकच श्रीहनुमान्

करि हनुमन्ता, निश्चय मनसा
सामान्य न तूं या कपिजनसा
करि हनुमन्ता, निश्चय मनसा
सामान्य न तूं या कपिजनसा
उचल एकदां पद वामनसा
घे विजयी उड्डाण
घे विजयी उड्डाण

Curiosità sulla canzone Asa Ha Ekach Shri Hanuman di सुधीर फडके

Chi ha composto la canzone “Asa Ha Ekach Shri Hanuman” di di सुधीर फडके?
La canzone “Asa Ha Ekach Shri Hanuman” di di सुधीर फडके è stata composta da Sudhir Phadke, G D Madgulkar.

Canzoni più popolari di सुधीर फडके

Altri artisti di