Anta Richya Gudh Garbhi
अंतरीच्या गूढगर्भी
एकदा जे वाटले
एकदा जे वाटले
ते प्रेम आता आटले
सखी प्रेम आता आटले
दूर सोनेरी सुखाचे
पाहिले आभास मी तू
रंगले आभाळ पूर्वी
तेच आता फाटले
सखी प्रेम आता आटले
सखी प्रेम आता आटले
एकदा ज्यातून मागे
सूर संवादी निघाले
वंचनेने तोडले
ते स्नेह तंतू आतले
सखी प्रेम आता आटले
सखी प्रेम आता आटले
शेवटी मंदावलेल्या
वादळी वाऱ्याप्रमाणे
वादळी वाऱ्याप्रमाणे
राहणे झाले दिवाणे
राहणे झाले दिवाणे
ते गीत गाणे कोठले
ते गीत गाणे कोठले
सखी प्रेम आता आटले
अंतरीच्या गूढगर्भी
एकदा जे वाटले
एकदा जे वाटले
ते प्रेम आता आटले
सखी प्रेम आता आटले