Aaj Ka Nishphal Hoti Baan

G.D. MADGULKAR, SUDHIR PHADKE

कुंभकरणाचे हे विचार खरेच होते
त्याने अतूल पराक्रम केला वानरांचे
जथेच्याजथे त्याने खाऊन फस्त केले
कैक बलाढ्य वनरवीरांना त्याने ठार केलं
सुग्रीवासारख्या वीराला विरचित केलं
लक्ष्मणाला तो आटोपला नाही पण अंती
श्री रामाणी बाण वर्षावाने त्याचे हाथ पाय तोडले
पर्वतासारखं प्रचंड असणारं त्याचा
मस्तक अंतरिक्ष मध्ये उडवून दिलं
इंद्रजितादी घोरपराक्रमी रावणपुत्रांचाही वध झाला
आणि क्रोधाने वेडा झालेला रावण अगदी एकटा
रामाला येऊन भिडला असंख्य प्रकारचे बाण आणि
असंख्य अस्त्र याचा उभे त्या वीरांनी एकमेकांवरती
पाऊस पाडला राम आणि रावण स्थिर असून नुसती
आयुद्धच तुमल युद्ध करत आहेत
असा काही काळ भास झाला
सप्तसागर क्षुब्ध झाले पाताळामध्ये वास्तव्य करणारे
दानव भुजंगही व्यथित झाले पृथ्वी हालू लागली
सूर्य निस्तेज झाला वायूचा संचारही बंद झाला
आणि एक भुजंगासारखा बाण फेकून
रामाने रावणाचा मस्तक उडवलं परंत्तू
चमत्कार असा घडला कि त्या मस्तकासारखं दुसरं
मस्तक त्याच्याजागी पुन्हा निर्माण झालं
अशी एकसारखी शंभर मस्तकं रामाने छेदली
परंतु रावणाचा अंत होण्याचं काही लक्षण दिसेना
रामाच्या सर्थ्यासाठी इंद्रानी मातली
नावाचा आपला सारथी रथासह दिलेला आहे
त्या सारथी मातली लाअत्यंत चिंतीत
होऊन राम विचारत आहेत

आज कां निष्फळ होती बाण आज कां निष्फळ होती बाण
पुण्य सरें कीं सरलें माझ्या बाहूंमधलें त्राण
आज कां निष्फळ होती बाण आज कां निष्फळ होती बाण
शरवर्षावामाजीं दारुण
पुन्हां तरारे तरुसा रावण
शरवर्षावामाजीं दारुण
पुन्हां तरारे तरुसा रावण
रामासन्मुख कसे वांचती रामरिपूचे प्राण
आज कां निष्फळ होती बाण
चमत्कार हा मुळिं ना उमजे
शीर्ष तोडितां दुसरें उपजें
चमत्कार हा मुळिं ना उमजे
शीर्ष तोडितां दुसरें उपजें
रावणांग कीं असे कुणी ही सजिव शिरांची खाण
आज कां निष्फळ होती बाण
शत शिर्षे जरि अशीं तोडिलीं
नभीं उडविलीं पदीं तुडविलीं
शत शिर्षे जरि अशीं तोडिलीं
नभीं उडविलीं पदीं तुडविलीं
पुन्हां रथावर उभाच रावण नवें पुन्हां अवसान
आज कां निष्फळ होती बाण आज कां निष्फळ होती बाण

इंद्रसारथे वीर मातली
सांग गूढता मला यांतली
इंद्रसारथे वीर मातली
सांग गूढता मला यांतली
माझ्याहुन मज असह्य झाला विद्येचा अपमान
आज कां निष्फळ होती बाण आज कां निष्फळ होती बाण

वधिला खर मी वधिला दूषण
वधिला मारिच विराध भीषण
वधिला खर मी वधिला दूषण
वधिला मारिच विराध भीषण
हेच बाण ते केला ज्यांनी वाली क्षणिं निष्प्राण
आज कां निष्फळ होती बाण आज कां निष्फळ होती बाण

ज्यांच्या धाकें हटला सागर
भयादराचे केवळ आगर
ज्यांच्या धाकें हटला सागर
भयादराचे केवळ आगर
त्या भात्यांतच विजयि शरांची आज पडे कां वाण
आज कां निष्फळ होती बाण आज कां निष्फळ होती बाण

सचैल रुधिरें न्हाला रावण
सिंहापरी तरि बोले गर्जुन
सचैल रुधिरें न्हाला रावण
सिंहापरी तरि बोले गर्जुन
मलाहि ठरला अवध्य का तनुधारी अभिमान
आज कां निष्फळ होती बाण
सचिंत असतिल देव अप्सरा
सुचेल तप का कुणा मुनिवरा
सचिंत असतिल देव अप्सरा
सुचेल तप का कुणा मुनिवरा
व्यर्थच झालें काय म्हणूं हें अवघें शरसंधान
आज कां निष्फळ होती बाण आज कां निष्फळ होती बाण

Curiosità sulla canzone Aaj Ka Nishphal Hoti Baan di सुधीर फडके

Chi ha composto la canzone “Aaj Ka Nishphal Hoti Baan” di di सुधीर फडके?
La canzone “Aaj Ka Nishphal Hoti Baan” di di सुधीर फडके è stata composta da G.D. MADGULKAR, SUDHIR PHADKE.

Canzoni più popolari di सुधीर फडके

Altri artisti di