आकाश झाले
Karan Kulkarni
आकाश झाले हळवे जरासे आले भरूनसे
ढगांचे किनारे अवेळी वहावे आले गळूनसे
नको जीव लावू अशा पावसाला तो आहे इथे पाहुणा
पंख फुटून गेला उडून तरी फुलवेल मना
ओलावा पेरून जाई निघून ढगांचा पुढे कारवा
हं हं हं हं हं हं
आ आ आ आ आ आ
लाट फिरुनी किनारी परतली पाण्यानं भरले ठसे
वाळूत गिरवले शब्द हरवले नाते बदलले असे
तरी जीव माझा जपून जरासा मी आहे इथे ठेवला
उबेची दुलई जणु मीच आई झाले निघत्या क्षणा
ओलावा पेरून जाई निघून ढगांचा पुढे कारवा